केशवसुत स्मारक वाचनालयात रंगला कोमसापचा नवांकुर मेळा

आचरा (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषद मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर(गुरुजी) यांचे बीज अंकुरे अकुरे हे पुस्तक काही दिवसापूर्वी प्रकाशीत झाले. यापुस्तकाची प्रत घेऊन कोमसापची टिम केशवसुत जन्मस्थान, स्मारक मालंगुड येथे गेली होती. यावेळी स्मारकाला भेट देत कोमसाप मालवणच्या वतीने तेथील वाचनालयात नवांकुर कविता सादरीकरण करण्यात आल्या. नवा कवींनी यावेळी कविता सादर केल्या. त्यामध्ये दौलत राणे यांनी आये आमची खय काय करता या कवीते पासून सुरूवात केली तर अनुक्रमे वैजयंती करंदीकर – प्रार्थना, मधुरा माणगांवकर – मला भास होणे, सुगंधा गुरव – विठू सावळा, रामचंद्र कुबल – केशवसुत, सुरेंद्र सकपाळ – पहिला पाऊस, रसिका तेंडोलकर-फका, नारायण धुरी – चला मुलांनो अशा एका पेक्षा एक सरस कविता म्हटल्या तर यावर कळस चढवला तो आदिती मसुरकर यांच्या बाप्पा मला एक मोदक देशील का? या बालगीताने, यावेळी माधव अंकलगे सचिव कोमसाप, विलास राणे सचिव स्मारक समिती, मेहेंदळे, कोमसापचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक ठाकूर गुरुजी यांनी तर सुत्रसंचालन आणि समारोप ऋतुजा केळकर यांनी केले.

error: Content is protected !!