कोल्हापूर (रोहन भिऊंगडे): कोल्हापूर,छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळातील दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमधील अंतर्गत वाद मिटविण्यात ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले याना यश आल.आज दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत वाद मिटवला. यापुढं मंडळातील सर्व कार्यकर्ते एकत्र येवून सण, उत्सव साजरे करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांना भेट घेवून दिली. दरम्यान, छत्रपती शिवाजी चौक मित्र मंडळाचं नाव बदलून क्षीरसागर यांचं नाव देण्याचा प्रयत्न हाणून पाडला असून इथून पुढंं मंडळाच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्रितपणे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतील असं ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितलं. शहरातील भेंडे गल्ली कॉर्नर येथील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळ गेली काही वर्षे गणेश उत्सवासह विविध सामाजिक उपक्रम राबवतंं. दरम्यान, गेल्या दोन तीन वर्षापासून मंडळात अंतर्गत धुसफूस होऊन दोन गट तयार झाले होते. दोन्ही गटांनी मंडळावर आपला दावा सांगत धर्मादाय आयुक्ताकडे दाद मागितली होती. यापैकी एका गटानं नुकताच दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला. त्यामुळं हा वाद आणखीन उफाळला होता. त्यामुळं पोलिसांनी दोन्ही गटांना गणेश उत्सवासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र, याठिकाणी गणेश उत्सवाच्या मंडपाचं काम सुरूय. दरम्यान, यातील एका गटाच्या पदाधिकाऱ्यांनं पदाचा गैरवापर करत छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळ ऐवजी राजेश क्षीरसागर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ या नावानं गणेश उत्सवासाठी परवानगी मागितल्याचं कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं. यानंतर इंगवले यांच्या पुढाकारातून दोन्ही गटाचे प्रमुख पदाधिकारी एकत्र येत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्यातील वाद मिटला असून छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळास यापुढं सण उत्सवासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केली. यावेळी मंडळाचे स्वप्नील गवळी,राहुल अपराध. राजू नागवेकर विकी भुर्के केदार भुर्के यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.