आ.नितेश राणेंकडून बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची पाठराखण

मनसेवर केला हल्लाबोल

मुंबई (प्रतिनिधी): रखडलेल्या मुंबई गोवा हायवे च्या एक लेनवरून गणेशचतुर्थी पूर्वी वाहतूक सुरू करणार ही बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण भिमगर्जना फोल ठरल्यानंतर मनसेने मंत्री रवींद्र चव्हाण यांना टीकेचे धनी बनवले. बांधकाममंत्री चव्हाण हे आपले आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत. यावर्षीही गणेशभक्त चाकरमानी प्रवाशांना कोकणात खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत आहे आदी मुद्दगांवरून मनसेने मंत्री चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.मनसेच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी राणे स्टाईल मनसेवर हल्लाबोल केला. बांधकामंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची आमदार नितेश राणे यांनी पाठराखण करत मुंबई गोवा हायवे पूर्ण करण्यासाठी मंत्री चव्हाण यांनी घेतलेल्या मेहनती चे कौतुकहीकेले . मंत्री असूनही स्वतः 6 वेळा मंत्री चव्हाण यांनी हायवे औथोरिटी च्या अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा केला. उन्हातान्हात उभे राहून अत्याधुनिक टेक्नॉलॉजी ने मुंबई गोवा हायवे कसा पूर्ण होईल याकडे जातिनिशी त्यांनी लक्ष दिले आहे. हायवे पूर्ण होण्यामध्ये जमीनधारक जनतेच्या हरकती, प्रशासकीय अडचणी पावसाळ्याची भौगोलिक स्थिती आदी बाबीसुद्धा अडचणीच्या ठरल्या आहेत. तरीही मंत्री चव्हाण यांनी युद्धपातळीवर हायवेच्या एक लेनवरून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असे सांगत आमदार नितेश राणे यांनी मनसेच्या टीकेला परतवून लावत बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची पाठराखण केली. मनसेने सुद्धा नाशिक चा विकास करण्यासाठी 5 वर्षे घेतली. त्यानंतरही मनसेचे नाशिककरांनी काय केले हे सर्वांनी पाहिले असा टोला लगावतानाच मंत्री चव्हाण यांनी डिसेंबर अखेरपर्यंत हायवे पूर्ण करण्याचा शब्द दिला आहे.यासाठी विरोधकांनी थोडे संयमाने वागायला हवे असा सल्लाही आमदार नितेश राणे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!