आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणीतील वायंगणी नाका येथे नव्याने लावण्यात आलेल्या बैठक व्यवस्थेचे लोकार्पण सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. काही दिवसातच सपूंर्ण गावातील महत्त्वाच्या ठिकाणी बैठक व्यवस्था लावणार असल्याची माहिती उपसरपंच अँड. समृद्धी आसोलकर यांनी दिली आहे. या लोकार्पणाच्या वेळी उपसरपंच अँड समृद्धी आसोलकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन रेडकर, संजना रेडकर, श्रीकृष्ण वायंगणकर, पोलिस पाटील, त्रिंबककर, तंटामुक्ती अध्यक्ष महाजन, गावातील ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.













