कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ बाजारपेठ येथील शिवतेजा मित्रमंडळाने आयोजित केलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नंदिनी बिले हिने प्रथम क्रमांक मिळवला. गुरुनाथ तुळसकर याने द्वितीय तर वैष्णवी बोडके हिने तृतीय क्रमांक मिळवला. पूर्वा मेस्त्री, गंश परब यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.
रेकॉर्ड स्पर्धेत १७ हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण शशिकांत कांबळी, आर्या पोयेकर यांनी केले. स्पर्धा पार पाडल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा पार पडला. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते आले. तसेच स्पर्धेत सहभागी स्पर्धेकांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन कुवळेकर, उपाध्यक्षा अनिता साळगावकर, प्रसाद कांबळी, शशिकांत कांबळी, आर्या पोयेकर, दिनेश पाटील, अमित कांबळी, संदीप कांबळी, तुषार हजारे, सुयोग कांबळी, परेश कांबळी, स्वरुप कोरगावकर, निश्चिय हुन्नरे यांच्यासह मंडळाचे सदस्य व महिला सदस्य उपस्थित होते.











