मसुरे सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी उत्तम राणे तर उपाध्यक्षपदी नंदा शिंगरे यांची निवड…

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र उत्तम सत्यविजय राणे तर उपाध्यक्षपदी नंदा बाळकृष्ण शिंगरे यांची निवड एकमताने करण्यात आली. ही निवड सन २०२५-२०२६ ते सन २०३०-२०३१ या कालावधीसाठी करण्यात आली आहे. या संस्थेच्या सचिव पदी रमेश गोविंद परब आणि खजिनदार पदी संजय रामचंद्र बागवे यांची निवड करण्यात आली असून सदस्य म्हणून प्रदिप रामचंद्र भोगले, विठ्ठल लक्ष्मण लाकम, हेमंत लाडोजी परब, पल्लवी संदेश साटले आणि तज्ञ संचालक पदी मोहन भिकाजी बागवे, राधिका श्रीकृष्ण परब यांची निवड मुंबई येथे करण्यात आली.

यावेळी बोलताना उत्तम राणे म्हणाले मसुरे सहकारी पतपेढी ही मसुरे गाव आणि तळागाळातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून उभी राहिलेली संस्था असून यापुढेही ते अतिशय पारदर्शक आणि सर्वांना बरोबर घेऊन कारभार केला जाईल आणि ही पतसंस्था राज्यांमध्ये नंबर वन आणण्यासाठी आम्हा सर्वांचा प्रयत्न राहील. नवीन संचालक मंडळाला विविध मान्यवरांनी तसेच मसुरे ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्यात…

संजय बागवे

नंदा शिंगरे

उत्तम राणे

रमेश परब

error: Content is protected !!