खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या वतीने सुकांत वरूणकर यांचा युवा उद्योजक पुरस्काराने सन्मान

खारेपाटण (प्रतिनिधी) :आदर्श व्यापारी संघटना खारेपाटण यांच्या वतीने खारेपाटण बस स्थानक प्रागणात आयोजित करण्यात आलेल्या खारेपाटण येथील व्यापाऱ्याच्या वार्षिक स्नेहमेळावा कार्यक्रमात खारेपाटण गावचे रहिवासी व सामजिक कार्यकर्ते सूकांत वरूणकर यांचा यशस्वी युवा उद्योजक पुरस्कार जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रसाद पारकर यांच्या शुभहस्ते देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सुकांत वरुणकर यांनी हार्ड रॉक कंट्रोल ब्लास्टिंग व्यवसायात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. मुंबई गोवा नॅशनल हायवे चौपदरीकरण, समृद्धी महामार्ग, आनंदवाडी बंदर प्रकल्प, चिपी एअरपोर्ट, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्प आदी मोठ्या प्रोजेक्ट्स मध्ये सुकांत यांनी आपली जबाबदारी पार पाडत चोख काम केले.त्यासोबतच कोव्हीड काळात खारेपाटण सीमेवर हजारो प्रवाशांना अन्नदान केले. खारेपाटण पीएचसी मध्ये कोव्हीड लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मंडप बांधून देत त्यांच्यासाठी मोफत पाणी बिस्कीट ची सोय केली.सुकांत वरुणकर यांनी उद्योग व्यवसायात केलेल्या प्रगतीबद्दल त्यांना युवा उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्राजल कुबल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या व्यापारी मेळाव्याचे उद्घाटन खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर,यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी असोसिएशनचे कार्यवाह नितीनजी वाळके,राजू जठार, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर,कणकवली अध्यक्ष दीपक बेलवलकर, तळेरे व्यापारी अध्यक्ष स्वप्नील कल्याणकर खारेपाटण ग्रा प सदस्य गुरूप्रसाद शिंदे, सुधाकर ढेकणे,जयदीप देसाई,जिल्हा व्यापारी असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य योगेश गोडवे, अनंत गांधी, खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष अविनाश गाठे , सचिव रमेश जामसंडेकर, प्रकाश मोहीरे, खजिनदार संजय धाक्रस आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

“खारेपाटण व्यापारी असोसिएशन ने माझ्यासारख्या एक सर्वसामान्य युवा कार्यकर्त्याचा यशस्वी युवा उद्योजक पुरस्कार देऊन सन्मान करून खारेपाटण मधील असंख्य युवकांना उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा व पाठबळ दिले असून खारेपाटण व्यापारी असोसिएशन या संघटनेचा मी कायम ऋणी राहीन.” असे भावपूर्ण उदगार स्त्काराला उत्तर देताना श्री सुकांत वरूणकर यांनी काढले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत आदर्श व्यक्तीचा सन्मान खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश गुरव यांनी केले.तर प्रस्ताविक अध्यक्ष प्राजल कुबल तसेच आभार रमेश जामसंडेकर यांनी मानले यावेळी खारेपाटण येथील असंख्य नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!