मिशन लक्षवेध अंतर्गत विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग यांचे द्वारा प्रथम टप्प्यात मिशन लक्षवेध अंतर्गत कोल्हापूर येथे शूटिंग व कुस्ती कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर येथे वेटलिफ्टिंग व सांगली येथे रोईंग अशा खेळांचे विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलेंस सेंटर सुरू करण्यात येणार आहे प्रत्येक खेळासाठी 20 खेळाडूंची निवड करण्यात येणार असून यासाठी राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त व राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू तसेच दिनांक 31 डिसेंबर 2026 रोजी वय 25 वर्षे आतील असणे आवश्यक्य आहे अशी किमान अहर्ता असून मागील दोन वर्षातील कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येईल तसेच क्रीडा कौशल्य व शारीरिक क्षमता चाचण्या घेऊन प्रशिक्षणार्थींची निवड अंतिम टप्प्यात करण्यात येणार आहे. 

विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर मध्ये निवड होणाऱ्या खेळाडूंना निवास भोजन गणवेश व प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक इत्यादी सुविधा पुरविण्यात येणार आहेत यावरील खर्च शासनाद्वारे करण्यात येणार आहे तरी वर नमूद केलेल्या अहर्ताधारक खेळाडूंनी अर्ज दिनांक २४.०3.2026 रोजी पर्यंत विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम रेस कोर्स नाका संभाजीनगर कोल्हापूर फोन ०२३१-२९५११०८ येथे प्रत्यक्ष अथवा dydkop@gmail.com या ई-मेलवर मुदतीत सादर करावेत असे आवाहन श्री सुहास पाटील विभागीय उपसंचालक कोल्हापूर विभाग यांनी केलेले आहे.

error: Content is protected !!