कणकवली (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांच्या सौजन्याने आणि खारेपाटण शिवसेना विभागाच्या वतीने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य प्राची इस्वलकर, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर तरटे, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश गुरव, शहरप्रमुख सुहास राऊळ, मंगेश ब्रह्मदंडे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, ग्रा. पं. सदस्य जयदीप देसाई, किरण सरले, मनाली होनाळे, बूथ प्रमुख शेखर कांबळे, शरद गुरव, अभिजीत गुरव आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस आज जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. याच निमित्ताने खारेपाटण विभागात हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रुग्णांना फळवाटप करण्यात आले तसेच त्यांच्या आरोग्याचीही आस्थेने चौकशी करण्यात आली.












