देवगडात भाजपाकडून होऊ देच चर्चा चे बॅनर लावून प्रत्युत्तर

देवगड जामसंडे नगरपंचायत च्या भोंगळ कारभाराचा बॅनर मधून पर्दाफाश

उबाठा सेनेच्या आज होणाऱ्या होऊ द्या चर्चा वर भाजपाचा बॅनरमधून पलटवार

देवगड (प्रतिनिधी): देवगडात उ. बा. ठा. शिवसेनेला आव्हान देणारे होऊ देच चर्चा टॅगलाईन चे लक्षवेधी बॅनर भारतीय जनता पार्टीकडून जागोजागी लावलेले चित्र पाहायला मिळत आहे. देवगड शहर नगरपंचायत मधील सत्ताधारी उबाठा सेनेच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश या बॅनर मधून भाजपा ने केल्याचे दिसून येत आहे.देवगड जामसंडे नगरपंचायत मागील 2 वर्षात उबाठा सेनेच्या कार्यकाळातील अपयशी कारभारावर होऊदेचं चर्चा चे लक्षवेधी बॅनर झळकलेत. ह्या बॅनर्स मधून देवगड नगरपंचायतचा मागील 2 वर्षाच्या कालावधीतील भोंगळ कारभार मांडण्यात आला आहे.

ह्या बॅनर्स वर लिहिलेले मजकूर लक्षवेधी आहेत. शहरातील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी कधीही न झालेल्या वणवणीची होऊ देच चर्चा, कचरा व्यवस्थापनाचे भोंगळ नियोजन, स्थानिक मच्छीविक्रेत्या महिलांची गैरसोय, मोकाट गुरांमुळे जनतेला होणारा नाहक त्रास, दास प्रतिबंधक धूर फवारणी न झाल्यामुळे होणारे डेंग्यू सारखे साथीचे रोग, जाहीर केलेल्या फसव्या विविध योजना, मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे होऊदेच चर्चा, बंद स्ट्रीट लाईटची होऊ देच चर्चा, स्वच्छता कर आणि आरोग्य कर वाढीची होऊ देच चर्चा, दोन वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची होऊदेच चर्चा यांसारखे अनेक मुद्दे घेऊन देवगड जामसंडे शहर भाजपाकडून उ. बा. ठा. शिवसेनेला थेट भाजपा स्टाईल ने प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

error: Content is protected !!