राज्यस्तरीय ‘विशाल दांडिया स्पर्धा’ स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद
वेंगुर्ले (प्रतिनिधी): भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते रात्री ११ वाजेपर्यतच्या कालावधीत श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय, भटवाडी येथे ‘भव्य दिव्य सिंधु युवा विशालोत्सव_शोध नाविन्याचा’ व “राज्यस्तरीय विशाल दांडिया स्पर्धा या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना सर्व स्पर्धकांकडून उत्फुर्त प्रतिसाद लाभलेला आहे. अशी माहिती विशाल परब मित्रमंडळ व भाजपतर्फे प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी दिली. सिंधु युवा विशालोत्सव. शोध नाविन्याचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सांस्कृतिक कलागुण जपणूकीच्या उद्देशाने जिल्ह्यातील युवक आणि युवती यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी समूह नृत्यस्पर्धा, जोडी नृत्यस्पर्धा, मिमिक्री या स्पर्धेचे तसेच ‘राज्यस्तरीय विशाल दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “सिंधु, युवा विशालोत्सव शोध नाविन्याचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमांतील समूहनृत्य स्पर्धेसाठी ‘भारताची लोकपरंपरा’ हा विषय असून जिल्ह्यातील संघ सहभागी झालेले आहेत. समूहनृत्य स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रोख रूपये ११०००, ७५००, ५०००, २५००, २५०० ची पारितोषिक, चषक व प्रमाणपत्र ठेवण्यात आली आहेत. जोडी नृत्य स्पर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी असून ‘वेस्टर्न गीतावरती’ जोडीनृत्य सादर करणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या क्रमांकास अनुक्रमे रोख रुपये ५०००, ३०००, २०००, १०००, १००० ची पारितोषिके, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ‘मिमिक्री’ स्पर्धेतील विजेत्या क्रमांकास अनुक्रमे रोख रू. ३०००, २०००, १०००, ५००, ५०० अशी पारितोषिके तसेच चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सचिन परुळकर- ९४२१२३८०५३ यांच्याशी संपर्क साधावा. तर “राज्यस्तरीय विशाल दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रोख रूपये ११,०००, ७,५५५, ५,५५५, २,५५५, २,५५५ तसेच सर्व चषक अशी पारितोषिके, इतर सहभागी संघांना प्रवास खर्च १ हजार रुपये देण्यात येणार आहेत. या दांडिया स्पर्धेसाठी चित्रपट व मालिका नृत्य व नाट्य दिग्दर्शक व कला दिग्दर्शक सागर बगाटे हे परीक्षक असणार आहेत. भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी होणाऱ्या ‘सिंधु युवा विशालोत्सव शोध नाविन्याचा’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा रसिक जनतेने बहुसंख्येने घ्यावा असे आवाहन विशाल परब मित्रमंडळ व भाजपतर्फे प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.