त्रिंबक हायस्कूल आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय शुटींग बाँल स्पर्धा
सांगली जिल्हा व सांगली मनपा संघाचे वर्चस्व
प्रतिनिधी (आचरा): क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व माध्यमिक शिक्षण समिती संचलित जनता विद्या मंदिर त्रिंबक आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धा त्रिंबक हायस्कूलच्या भव्य मैदानावर दहा ऑक्टोबर रोजी संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा डायरेक्ट बाँल असोसिएशन अध्यक्ष जय कदम व आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोळकर, उपसरपंच आशिष बागवे, शिक्षक अमित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोळकर म्हणाले कि अशा विभागीय स्पर्धा त्रिंबक सारख्खा ग्रामीण भागात भरवल्यांचे कौतुकास्पदच याने खेडो पाडी क्रीडा संस्कृती रुजेल व उत्कृष्ट खेळाडू तयार होतील. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून वीस संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत 19 वर्षे मुलगे गटात सांगली संघ प्रथम, कोल्हापूर व्दितीय, 19 वर्षे मुली सांगली मनपा प्रथम तर सिंधुदुर्ग व्दितीय, 17 वर्षे मुली सांगली प्रथम तर कोल्हापूर जिल्हा व्दितीय क्रमांक प्राप्त केला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून रितेश शिर्के व प्राजक्ता आळवे यांना गौरविण्यात आले. बक्षीस वितरणासाठी जिल्हाभरातून अनेक नामांकित शूटिंग बॉल खेळाडू उपस्थित होते. यावेळी माध्यमिक शिक्षण समिती अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, कार्यवाह अरविंद घाडी, शालेय व्यवस्था समिती प्रफुल्ल प्रभू, त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर, मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, नॅशनल खेळाडू योगेश गावडे, राष्ट्रीय पंच शशी गवंडे, प्रताप बागवे, उद्योजक प्रकाश मेस्री, उद्योजक मंगेश गावकर, डॉ. सिद्धेश सकपाळ, पोलीस पाटील बाबू सकपाळ, महासंघ अध्यक्ष अजय शिंदे, क्रीडा अधिकारी विजय शिंदे, राजू परुळेकर, राजू भावे, बबन गवस, एकनाथ केसरकर, मीनानाथ वारंग, क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग, शैलेश मुळीक, दिनेश सावंत, संतोष तावडे, अभिजीत धुळे, संतोष मेस्री, अमेय लेले, जयवंत बागवे, संदेश रावले, ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक महिंद्र वारंग यांनी तर आभार गोसावी यांनी मानले.