कणकवली (प्रतिनिधी): महाविजय 2024 अभियान साठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 19 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असल्याची माहिती दुपारी 3 वाजता खारेपाटण मध्ये येतील, दुपारी साडेतीन वाजता कणकवलीत भगवती मंगल कार्यालयात भाजपा सुपर वारीयर्स सोबत बैठक, त्यानंतर भालचंद्र महाराज मठात दर्शन घेणार आहेत. घर चलो अभियान अंतर्गत पटकीदेवी मंदिर येथे नागरिकांशी संपर्क साधणार असून सायंकाळी साडेपाच वाजता कणकवलीत कॉर्नर सभा घेणार आहेत. त्यानंतर ते सावंतवाडीत जाणार आहेत.यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्रि रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित असणार आहेत. 2024 च्या निवडणूक मध्ये पंतप्रधान मोदी हेच पुन्हा पंतप्रधान असतील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग चा खासदार हा युती चाच असणार आहे. मागील 9 वर्षात निष्क्रिय खासदार असल्याने लोकसभा मतदारसंघाची पीछेहाट झाली आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असतानाही राऊत विकासकामे करू शकले नाही. अडीच वर्षे यूद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही विकासकामे करण्यात खासदार विनायक राऊत अपयशी ठरले. त्यामुळे येत्या निवडणुकीत आम्ही महायुती चाच उमेदवार निवडून आणणार आहोत. भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष जो उमेदवार देतील त्याला बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम आदी उपस्थित होते.
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 19 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गात – आ.नितेश राणे











