सांगवेत घरफोडी ; बंगला फोडून 50 हजारांचा मुद्देमाल लंपास

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली कनेडी रस्त्यावरील सांगवे संभाजीनगर येथील पामतेल समोरील वासुनंदा हा बंद बंगला फोडून अज्ञात चोरांनी घरातील 50 हजारांचा मुद्देमाल चोरीला. जयश्री पुंडलिक सावंत यांनी याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.सावंत यांचा बांगला 7 सप्टेंबर 2022 पासून बंद होता. बंगल्याचे मागील दार उघड असल्याचे गुराख्याने पोलीस पाटील यांना कळवले. त्यानंतर आज घरमालक जयश्री सावंत यांनी मुंबईहून येत पाहणी केली असता घरातील टीव्ही वॉशिंग मशीन गिझर, पंचधातूच्या देव्हाऱ्यातील मूर्ती आदी सुमारे 50 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.पीएसआय विनायक चव्हाण, कनेडी दुरक्षेत्राचे हवालदार देसाई, यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

error: Content is protected !!