फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुष्यमान भारत योजनेनंतर्गत 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा ई कार्ड नोंदणी करण्यात आली.यावेळी बोलताना आग्रे म्हणाले की गोरगरीब जनतेला खर्चिक वैद्यकीय उपचार करणे अवघड जाते.साहजिकच आर्थिक स्थिती नसल्यामुळे योग्य ते आवश्यक उपचारांकडे नाईलाजाने पाठ फिरवावी लागते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने आम आदमी च्या आरोग्याची दखल घेत तब्बल 5 लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा कवच कुटुंबियांना दिले आहे. याचा फायदा सर्व नागरिकांनी घेऊन आपले आरोग्य विमा ई कार्ड नोंदणी करून घ्यावी. सरपंच संजना आग्रे, सोसायटी चेअरमन राजन नानचे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध असणारे आरोग्य विमा ई कार्ड ची नोंदणी करण्यात आली.या सुविधेमुळे प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना दरवर्षी एकूण 5 लाख रुपयांपर्यंत चे वैद्यकीय उपचार मोफत करण्यात येणार आहेत.सर्वसामान्य जनतेला आरोग्यविषयक मोठ्या खर्चाची ऑपरेशन्स तसेच अन्य उपचार या योजनेंतर्गत मोफत मिळणार आहेत. यावेळी सोसायटी संचालक दूर्वा गोसावी, नागेश कोरगावकर, सचिव प्रसाद देसाई, प्रकाश हळदिवे, सौ.शालीनी हळदिवे, श्रीमती सावंत वहिनी , श्री विजय नानचे, आरोग्य कर्मचारी श्री विलास फोंडके, शंकर राठोड, श्री केंद्रे , शर्मिला मडवी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.












