खारेपाटण विभाग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजप पक्षाने मारली बाजी

शेर्पे व वायंगणी बिनविरोध तर वारगाव मध्ये उबाठा सेनेचा पराभव करत भाजप चे प्रमोद केसरकर विजयी

खारेपाटण (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२३ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण विभागातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजप पक्षाने चांगली बाजी मारली असून खारेपाटण विभागातील शेर्पे व वायगणी या दोन्ही गावात भाजप पक्षाचे उमेदवार ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आले असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुण राहिलेल्या वारगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजप पक्षाचे श्री.प्रमोद केसरकर हे उबाठा सेनेच्या उमेदवाराचा पराभव करीत विजयी झाले आहेत.

भारतीय जनता पार्टीने खारेपाटण विभागातील जाहीर झालेल्या तिन्ही ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.यामध्ये शेर्पे ग्रा.पं.पोटनिवडणुकीत भाजपच्या महीला उमेदवार श्रीम.राजश्री बेळणेकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत.तर वायंगणी ग्रा.पं. पोटनिवडणुकीत भाजपच्या महिला उमेदवार श्रीम.शमिका सुतार या देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत.तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या वारगाव ग्रा.पं. पोटनिवडणुकीत दुहेरी लढतीत उबाठा सेनेच्या उमेदवाराचा पराभव करीत भाजप पक्षाचे उमेदवार प्रमोद केसरकर हे विजयी झाले.दरम्यान खारेपाटण विभागातील या सर्व तीन्ही ग्रा.पं.पोटनिवडणुकीत भाजप पक्षाचेच उमेदवार विजयी झाले असल्याने सर्व विजयी उमेदवारांचे भाजपा तालुका प्रमुख संतोष कानडे,माजी सभापती दिलीप तळेकर, भाजप कार्यकर्ते तथा माजी जिल्हा परिषद बांधकाम व वित्त सभापती रवींद्र जठार,शक्ती केंद्र प्रमुख श्री सूर्यकांत भालेकर,सुधीर कुबल यांनी अभिनंदन केले आहे.

वारगाव येथील ग्रा.पं. सदस्य १ जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उबाठा सेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन माजी सरपंच यांनी प्रचार करून देखील शेवटी येथील मतदारांनी भाजप पक्षाचा उमेदवार निवडून दिल्याबद्दल सर्व मतदाराचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जहिर आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

error: Content is protected !!