आ. नितेश राणे यांच्या हस्ते कलमठ ग्रामपंचायतच्या नव्या कचरा गाडीचे लोकार्पण

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नीतेश राणे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत मंजूर झालेल्या कलमठ ग्रामपंचायत साठीच्या नवीन कचरा घंटा गाडीचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. या कचरा वाहतूक करणाऱ्या गडीमुळे कलमठ गावची समस्या सुटली आहे. नियमत कचरा गोळा करून नेण्यासाठी ही गाडी उपयोगी ठरणार आहे. सरपंच संदीप मेस्त्री यांच्या पाठपुराव्याने ही नवी गाडी गावसाठी प्राप्त झाली आहे.

यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते, सुनील नाडकर्णी, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, विजय चिंदरकर, आबा कोरगावकर, सदस्य नितीन पवार, सुप्रिया मेस्त्री, हेलन कांबळे, प्रीती मेस्त्री, पपू यादव, श्रेयस चिंदरकर, बाबू नारकर, परेश कांबळी, समर्थ कोरगावकर, स्वरूप कोरगावकर, अमजद शेख, तेजस लोकरे, जितू कांबळे, ईशान फाटक, गोविंद साळकर, प्रदीप ढवण, गौरी साळकर, विकास मेस्त्री, कर्मचारी रमेश चव्हाण, गणेश सावंत, खुशाल कोरगावकर, रुपेश कदम उपस्थित होते. यावेळी सरपंच संदिप मेस्त्री यांनी आमदार नीतेश राणे यांचे आभार मानले.

error: Content is protected !!