नांदगाव (स्वप्नील तांबे): श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग (बी.एस्सी.) तोंडवलीचा प्रथम निकाल ८३ टक्के लागला असून कॉलेजमधून प्रशांती जंगले हीने ८० टक्के गुण मिळवून प्रथम आली . तसेच जिल्हात कॉलेजचा निकाल अव्वल स्थानी राहत यशस्वी परंपरा राखली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रथम बी.एस्सी. नर्सिग परीक्षेसाठी कॉलेज मधून ३० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. याधून द्वितीय प्राची हिंदळेकर ७८ टक्के, तृतीय अदिती तेर्से ७८ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. तर विशेष प्रावीण्य १, प्रथम श्रेणीत ७, द्वितीय श्रेणीत १७ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष वसंत सावंत, संस्था पदाधिकारी, प्राचार्य शकुंतला बी. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना अभिनंदन केले.