खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे या गावातील गंधराज स्पोर्ट्स कुरंगवणे गोसावीवाडी यांनी आयोजित केलेल्या भव्य खुल्या गाव मर्यादित टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ नुकताच या गावचे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांच्या शुभहस्ते कुरगवणे गोसवीवाडी येथील मैदानवर फित कापून करण्यात आले.
गंधराज स्मृती चषक स्पर्धा – २०२३ या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपसरपंच बबलू पवार, ग्रा.प.सदस्य बाबला गोसावी, सामाजिक कार्यकर्ते महावीर गोसावी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक १५०००/- रुपये व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १०,०००/- रुपये व आकर्षक चषक असे ठेवण्यात आले असून उत्कृष्ट गोलंदाज,फलंदाज,शेत्ररशक, मालिकावीर व सामनावीर यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.













