असा ‘विराट’ होणे नाही! क्रिकेटच्या देवासमोर किंग कोहलीने ठोकलं ऐतिहासिक 50 वं शतक

मुंबई (ब्युरो न्युज) : एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णअक्षरात लिहून ठेवावा असा पराक्रम विराट कोहली याने केला आहे. न भूतो न भविष्य अशी कामगिरी विराट कोहली याने केली. वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल सामना मुंबईच्या वानखे़डे मैदानात खेळवला गेला. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील 50 वं शतक ठोकलं आहे. विराटच्या या कामगिरीमुळे आता विराट खऱ्या अर्थाने वनडे क्रिकेटचा बादशाह झालाय. विराट कोहली याने क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरचा 49 शतकांचा रेकॉर्ड मोडीस काढला आहे.

विराट कोहलीने साऊथ अफ्रिकाविरुद्घच्या सामन्यात वनडे क्रिकेटमधील 49 वं शतक पूर्ण केलं होतं. कोहलीने हे शतक करताना सचिन तेंडुलकरच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली होती. वाढदिवसादिवशी विराटने ही कामगिरी केली होती. त्यामुळे आता विराट यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 50 वं शतक ठोकणार का? असा सवाल विचारला जात होता. अशातच विराट कोहलीने 291 व्या सामन्यात 106 बॉलमध्ये विराटने आपलं 50 वं शतक पूर्ण केलं आहे.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. सचिन तेंडुलकरने 452 वनडे डावात 44.8 च्या सरासरीने तब्बल 18 हजार 426 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याने 49 शतकं ठोकली आहेत. त्याशिवाय 96 अर्धशतकंही लगावली आहेत. सचिन तेंडूलकरने वनडे क्रिकेटमध्ये एक वेळा 200 चा आकडा देखील पार केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!