देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका मराठा समाजाचे अध्यक्षपदी संदीप साटम तर सचिव पदी केदार सावंत यांची निवड झाली आहे. तर खजिनदारपदी अविनाश सावंत यांची एकमताने निवड झाली आहे. तसेच प्रत्येक विभागातून एक उपाध्यक्ष व दोन सदस्य देखील नेमण्यात आले आहेत.
देवगड तालुका मराठा समाजाच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन देवगड येथे रविवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी डॉ समीर मर्गज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ही नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
देवगड तालूका मराठा समाज कार्यकारिणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष संदीप साटम,उपाध्यक्ष मिलिंद माने (देवगड),अजित राणे (बापर्डे ), विनायक जोईल (मिठबाव), महेश पाटोळे (शिरगाव), संतोष चव्हाण (फणसगाव), गणेश राणे (पडेल ) सचिव केदार सावंत,सहसचिव शशांक साटम,खजिनदार अविनाश सावंत,सह खजिनदार किसन सूर्यवंशी, कार्यक्रम प्रमुख विजय उर्फ बंटी कदम,अमित साटम प्रमुख सल्लागार राजेंद्र राणे, कायदा सल्लागार अँड. रुपेश राणे, अँड. सिद्धी सावंत ,सदस्य प्रदीप सावंत, शरद ठुकरूल,संतोष नाईकधुरे,यशवंत पाळेकर,सदानंद देसाई,पंकज दुखंडे व संदेश लाड तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री.बच्चे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.











