गोपुरी आश्रम येथे मुलांना प्रमाण पत्र देवून झाली सांगता
कणकवली (प्रतिनिधी): आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या गोपुरी आश्रम मध्ये आप्पासाहेब पटवर्धनांचे विचार समजून घेत त्यांच्या सानिध्यात राहण्याचे भाग्य मिळणे म्हणजे ही एक आनंदाची बाब म्हणावी लागेल. तीच संधी मुलांनी न दवडत ज्ञानाच्या सागरात स्वतः त्यात उतरून ज्ञानाची एक वेगळी अनुभुती त्यांनी अनुभवली.अनुभव शिक्षा केंद्र आणि गोपुरि आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 नोव्हेबर ते 19 नोव्हेंबर 2023 असा एक रात्र एक दिवस असा 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ते काल मुलाना प्रमाण पत्र देवून संपन्न झाले. यात मुलांना प्रामूख्याणे लिडरशीप, क्रिटीकल थींकींग, मानसिक आरोग्य व्यवस्थापन, मैत्री प्रेम आकर्षण, करिअर गायडन्स या विषयांवर मार्गदर्शन तसेच मुलांसाठी विरंगुळा म्हणून काही ॲक्टिव्हिटी सुद्धा घेण्यात आल्या विशेष म्हणजे या शिबिरात मुलांना तज्ञांचे मार्गदर्शन लाभले, साधारण ही कार्यशाळा 18 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी १० ला चालू झाली होती आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी ४ वा 30 मि. समाप्ती झाली. यात सुरुवातीला मुलांच्याच हस्ते उद्घाटन करून त्यांची ओळख श्रुती पाटणकर यांच्या मार्फत एक मेकांचा आवडता एक डायलॉग, नाव, काय होणार, आवडता रंग अशी ओळख झाली, त्यांनतर एक लीडर कसा असवा याबाबतची ॲक्टीव्हीटी सहदेव पाटकर, आणि विशाल गुरव यांनी घेतली , त्यात लीडर चे प्रकार, टीम वर्क, आपण कोणता लीडर निवडावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यांनतर दुपारच्या सत्रात क्रिटिकल थिंकींग यावर सहदेव पाटकर यांनी मार्गदर्शन केले, यात वर्तमान पत्र ची ॲक्टीव्हीटी, काही मार्गदर्शक व्हिडिओ मार्फत मुलाना मार्गदर्शन केले. तर करिअर गायडन्स यात उद्योजगतेतून रोजगार निर्मिती कशी करावी याबाबत शेख सर यांनी मुलाना मार्गदर्शन केले. यात त्यांनी शेती पूरक व्यवसाय, साध्या व सोफ्या पद्धतीत कसे करू शकतो यावर चर्चा केली. मुलांचे काही प्रश्न त्याची उत्तरे अश्या पद्धतीने हे सेशन पार पडले. त्यानंतर मुलाना एक तास वेळ देवून ६ वा. ३० मी. पुनः मानसिक आरोग्य व्यवस्थापन कसे करावे या साठीचे छोटे खानी सेशन विशाल गुरव यांनी घेतले त्यात काही वेळ मेडीटेशन करून त्यांना स्वतः ला पत्र लिहायला देवून . काही वेळ चर्चा करून . त्यांना काही व्हिडिओ दाखवून मार्गदर्शन केले. त्या दिवसाचा फीडबॅक घेवून . व रात्री संस्कृतिक कार्यक्रमाद्वारे पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता रिकॅप व गाण्या द्वारे सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ९ वा. ३० मी. अभिनायातील संधी व योग्य दिशा कशी निवडावी याबाबत सध्या सन मराठी वर चालू असलेल्या वेतोबा सीरियल मद्ये मास्तर यांची भूमिका साकारणारे प्रमोद कोयंडे सर यांनी मुलाना हसत खेळत मार्गदर्शन केले. त्यानंतर मैत्री प्रेम आकर्षण या विषावर कवित्री, लेखिका रुपाली कदम यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर ३’३० वा. सांगता कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी स्वप्नील वर्देकर, साद टीम अध्यक्ष श्रेयश शिंदे, सिद्धी वरवडेकर, गोपुरी आश्रम अध्यक्ष मुंबरकर सर, अर्पिता मुबरकर, अनुभव शिक्षा केंद्र जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, लेखक अनिल जाधव सर उपस्थित होतें यावेळी या मान्यवरांनी देखील मुलाना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. तसेच मुलांन कडून यदनेश पोकळे, बुषरा बागवन, दिशा इसवलकर, आदी शिबारर्थिनी मनोगत व्यक्त केले. तर या सांगता कार्यक्रमाचे सूत्र संचालन बुषरा बागवन हिने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन विशाल गुरव यांनी केले. तर या शिबिरात राजापुर, खारेपाटण, कणकवली, वेंगुर्ले, या तालुक्यातील मिळून एकूण 25 शिबिरार्थी सहाभागी झाले होते. या शिबिरासाठी गोपूरी आश्रम, साद टीम, प्राध्यापक डॉ राजेंद्र मुंबरकर सर, अनुभव शिक्षा केंद्र चे महाराष्ट्र राज्य समन्वयक सचिन नाचानेकर, जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच काही दानकर्त्यांनी सढळ हाताने केलेल्या मदतीमुळे हा कार्यक्रम अगदी उत्तम रित्या पार पडला.