श्री लिंगेश्वर मंदिरात रंगोत्सव जल्लोषात; चिमुकल्यांची ‘होळी रे होळी’ची धम्माल

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कलमठ गावडेवाडी येथील श्री लिंगेश्वर मंदिरात दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा तसेच होळी यांसारखे सर्व सण दरवर्षी भक्तीभावाने आणि उत्साहात साजरे केले जातात. याच परंपरेला साजेसा रंग धुळीवंदनानिमित्त पाहायला मिळाला. मंदिर परिसरात चिमुकल्यांनी रंगांची उधळण करत “होळी रे होळी, पुरणाची पोळी… होळी शिमग्याचा सण आयला!” अशा स्वरात जल्लोष केला.

गुलालाच्या रंगांनी नटलेले चेहरे, निरागस हास्य आणि आनंदी वातावरणामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने न्हाऊन निघाला. भक्ती, परंपरा आणि बालसुलभ आनंद यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने गावडेवाडीतील हा रंगोत्सव विशेष ठरला.

error: Content is protected !!