लग्न, मुंज, साखरपुडा, हळद, बर्थडे, रिसेप्शन, गेट टुगेदर, सभा यासाठी अत्यंत सोयीस्कर
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बांधकरवाडी येथे सौ दिशा दीपक अंधारी यांच्या विशेष संकल्पनेतून साकारण्यात आलेले नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय खुले सभागृह चे उद्घाटन सौं. दिशा अंधारी यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले.निसर्गाच्या सानिध्यात साखरपुडा,मुंज, हळद, लग्न,स्वागत समारंभ, वाढदिवस गेट-टुगेदर,विशेष सभा इत्यादी करिता अत्यंत उपयुक्त असा श्री दत्त गार्डन रिसॉर्ट – मल्टिपर्पज हॉल हा कणकवली बाजारपेठे पासून फक्त दोनच मिनिटाच्या अंतरावर,रेल्वे स्टेशन कणकवली नजीक उभारण्यात आला आहे.
प्रशस्त पार्किंग सुविधा,स्वतंत्र किचन व्यवस्था, वधू वर साठी विशेष कक्ष, भव्य रंगमंच, स्पेशल सेल्फी पॉईंटस अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असलेल्या खुल्या सभागृहाचे उद्घाटन स्नेहलता आत्माराम अंधारी व सौ दिशा अंधाऱी यांच्या मातोश्री निर्मला महादेव शिरसाट यांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र चे शाखा व्यवस्थापक गणेश शिवथरे साहेब, व कणकवली व्यापारी संघटना अध्यक्ष दीपक बेलवलकर साहेब उपस्थित होते. तसेच या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी, कणकवली रोटरी क्लबचे अध्यक्ष रवी परब, अँड.राजेंद्र रावराणे, प्रा. हरिभाऊ भिसे, दादा कुडतरकर,महेश अंधारी उमेश वाळके,संदेश पारकर, अँड. विलास परब, डॉ. विद्याधर तायशेटे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, विलास जोशी इत्यादी मान्यवर तसेच अंधारी व शिरसाट कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते. हॉल बुकींगसाठी दिशा दीपक अंधारी मोबा. 9422997667 किंवा मोबा. 8888023688 यांच्याशी संपर्क साधावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले.













