अध्यक्षपदी प्रा.डाॅ.राजेंद्र मुंबरकर, कार्याध्यक्ष इंजि.अनिल जाधव आणि सरचिटणीस राजेश कदम यांची निवड
कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील आंबेडकरी आणि परिवर्तनशील चळवळीतील साहित्यिक- कलावंतांच्या संवेदनशीलतेला सजगता यावी आणि सम्यक संवादाचे धागे अधिक दृढ व्हावेत या उद्देशाने ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि ‘दलित’ पँथरचे सहसंस्थापक ज.वि.पवार अध्यक्ष असलेल्या ‘अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीची अलिकडेच स्थापना झाली. ज.वि.पवार यांच्या प्रेरणेतून कोकणातील सातही जिल्ह्यांत शाखा निर्माण करून अपरान्त साहित्य, कला प्रबोधिनी गतिमान करावी असा विचार पुढे आला. यासाठी केंद्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जिल्हा शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी गोपुरी आश्रम, वागदे येथे संपन्न झालेल्या निवड सभेस प्रांतिक सचिव कवी विठ्ठल कदम, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, साहित्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. सोमनाथ कदम, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य कवी जनीकुमार कांबळे आदी केंद्रीय सदस्य उपस्थित होते. या सभेत खालीलप्रमाणे जिल्हा शाखा कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष- प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर.
कार्याध्यक्ष- इंजि.अनिल जाधव.
सरचिटणीस -राजेश कदम.
उपाध्यक्ष- (प्रत्येक तालुकानिहाय)
१) कणकवली तालुका – प्राचार्य सिद्धार्थ तांबे.
२) देवगड तालुका- भरत नाईक (शिरगाव- निवृत्त तहसीलदार, मुंबई)
३) वैभववाडी तालुका- प्रफुल्ल जाधव
४) वेंगुर्ला तालुका- सगुण मातोंडकर
५) सावंतवाडी तालुका- बुधाजी कांबळे
६) दोडामार्ग तालुका-प्रकाश तेंडोलकर
७) कुडाळ तालुका- प्रा. संतोष वालावलकर
८) मालवण तालुका- राजेंद्र कदम
सहचिटणीस- सरिता पवार (कणकवली)
कोषाध्यक्ष- जनीकुमार कांबळे (कणकवली)
हिशोब तपासणीस -प्रकाश जाधव (देवगड)
जिल्हासंघटक- सूर्यकांत चव्हाण (कणकवली)
सल्लागार-
१) प्राचार्य युवराज महालिंगे
२) गोपीकृष्ण पवार
कार्यकारणी सदस्य
१) सुनील आत्माराम जाधव
२) रूपाली तुकाराम कदम
३) दीपक तळवडेकर
४) उत्तम गोविंद जाधव
५) राजेंद्र कृष्णा कदम
सोशल मीडिया- प्रसिद्धी विभाग
१)विशाल धोंडी हडकर
२) प्रतीक उत्तम पवार
३) स्नेहा विठ्ठल कदम
४) रूपाली तुकाराम कदम
वरील सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि सर्व तालुकाध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आले. प्रांतिक सचिव कवी विठ्ठल कदम यांनी नुतन कार्यकारिणीला सदिच्छा दिल्या. यावेळी कार्यकारिणी सदस्य प्रा.डाॅ.सोमनाथ कदम, भीमशाहीर जनीकुमार कांबळे, कवी सिद्धार्थ तांबे, इंजि.अनिल जाधव, यांनी आपल्या मनोगतात अपरान्त साहित्य, कला प्रबोधिनीच्या वैचारिक, सामाजिक चळवळीस सदिच्छा दिल्या.
नुतन जिल्हाध्यक्ष प्रा. डाॅ. राजेंद्र मुंबरकर यांनी अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीस आपले निरंतर सहयोग राहील असे मत व्यक्त करून प्रबोधिनीच्या वैचारिक, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्याच्या प्रत्येक उपक्रमांना जिल्हा कार्यकारिणीचेे नेहमीच सहकार्य राहिल असे प्रतिपादन केले. जिल्हा कार्यकारिणीचे नुतन सरचिटणीस राजेश कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.