संस्थेच्या वतीने करण्यात आला सन्मान
चौके (प्रतिनिधी) : सन२०२२-२३ मध्ये झालेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाची विद्यार्थीनी श्रेया समीर चांदरकर हिने महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत चौदावा क्रमांक प्राप्त केला तसेच वस्तू चित्र या विषयांमध्ये राज्यात दुसरा व संकल्पचित्र या विषयांमध्ये राज्यात सातवा क्रमांक प्राप्त केला. त्याचबरोबर ममता महेश आंगचेकर हिने राज्य गुणवत्ता यादीत 76 वा क्रमांक प्राप्त केला. वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचा एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी ४५विद्यार्थी प्रविष्ट झाले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल शंभर टक्के लागला. प्रतीक्षा पवार, श्रेया चांदरकर, हर्षदा हडलगेकर,ममता आंगचेकर,ऱीया भगत, धनश्री चव्हाण, मिताली चव्हाण,सानिका नांदोसकर, सुजल परब, सानिका मोडकर, विराज मेस्त्री या विद्यार्थ्यांनी ‘ अ’ श्रेणी प्राप्त केली. भावेश भोगटे,सेजल मेस्त्री, शुभम जांभवडेकर, मनीष चव्हाण,अथर्व गायकवाड, तन्वी जाधव, गायत्री कांबळे, अदिती तिळवे, स्वाती मिटबावकर देवदत्त गावडे, अनुष्का थवी, गंगुताई पाटील, साक्षी नाईक, ईश्वरी रावले,साहिल खोत, संकल्प पेंडुरकर, वृषाली सुर्वे, जयुश चव्हाण, कुणाल सावंत या विद्यार्थ्यांनी ‘ ब ‘श्रेणी प्राप्त केली.
यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक समीर चांदरकर, सहायक शिक्षक भूषण गावडे यांनी मार्गदर्शन केले.
राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रसिद्ध साहित्यिक अजय कांडर, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर,उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत वरची गुरामवाडीचे सरपंच शेखर पेणकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका वासंती किणीकर, मुख्याध्यापक संजय नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई सहसचिव साबजी गावडे शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, बाबाराव राणे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अनिल फणसेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
