कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आज कणकवली बौद्धविहार येथे उपेक्षित व शोषित घटकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे व त्यांच्या उधारासाठी आयुष्य वेचणारे धर्म व जाती व्यवस्थबाबात समाजक्रांति घड़वुन आणणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामहापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुण अभिवादन केले त्यावेळी कणकवली तालुका बौद्ध विकास संघ अध्यक्ष अंकुश कदम,कोषाध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष सुनील ताँबे, माजी अध्यक्ष जी.डी.कदम,वसंत कदम, मोहन ताँबे राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य दिलीप वर्णे, प्रांतीक सदयस्य विलास गावकर,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर,शहर सरचिटणीस गणेश चौगुले,जिल्हा सचिव सतीश पाताडे, तालुका उपाध्यक्ष सत्यवीजय परब, खजिनदार राजू वरदम, तालुका सरचिटणीस किशोर गावकर,उदय सावंत,बाळू मेस्त्री आदि उपस्थित होते