कणकवली (प्रतिनिधी): लोरे नं. 1 येथील प्रतिष्ठित नागरिक तथा निवृत्त ग्राम विस्तार अधिकारी नारायण राजाराम रावराणे उर्फ ताता वय 83 वर्षे याचे शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कै.नारायण राजाराम रावराणे यांनी आपल्या सेवा काळात ग्रामविस्तार अधिकारी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तथा वैभववाडी तालुक्यामध्ये अतिशय उत्तम सेवा दिली होती. तसेच गाव देवस्थांचे प्रमुख मानकरी असल्याने व आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या कै. नारायण रावराणे यांचा गावातील समाजिक कार्यात हिरीरीने सहभाग असायचा. त्यामुळे त्यांच्या दुःखद निधनाने लोरे नं.1 गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे आणी तीन मुली ,जावई नातवंडे असा परिवार आहे