लोरे-मोगरवाडी शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
फाेंडाघाट (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून लोरे मोगरवाडी शाळेच्या दुरुस्त केलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन गावचे सरपंच विलास नावले यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लोरे मोगरवाडी शाळेच्या जुन्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले. त्या इमारतीचे उद्घाटन गावचे सरपंच विलास नावले यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी करण्यात आले.यावेळी सरपंच यांनी इमारतीचे बांधकाम सुंदर व छान केल्याबद्दल कौतुक केले.अष्टपैलू शिक्षक शाळेला लाभल्याने येथील विद्यार्थी प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन यश संपादन करत आहेत याबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले.भौतिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.गावाचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाला आणि जगाला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहेत.महामानवाने संविधानामध्ये नमूद केलेल्या गोष्टींचा उपयोग समाज आणि देशाचा विकास होण्यासाठी होत आहे,असे ते म्हणाले.
यावेळी शाळेकडून इमारतीचे बांधकाम करणारे अनिल नराम यांचा सत्कार करण्यात आला.तसेच ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच महेंद्र रावराणे,उपसरपंच रुपेश पाचकुडे,सदस्य रितेश मेस्त्री,केंद्रप्रमुख गौतम तांबे, शिक्षक प्रशांत रासम,नितीन पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाला नारायण म्हादये,महेंद्र गोसावी,नियती तांबे,दर्पणा बोबकर,प्रणिता रासम,संचिता आग्रे,ज्योती नराम,सोनाली आग्रे,स्मिता आग्रे,शांताराम आग्रे,देवकुमार जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दशरथ बोबकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार शाळेचे मुख्याध्यापक युवराज पचकर यांनी केले.