सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा प्रधान कार्यालय ओरोस येथे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्यकार्य अधिकारी प्रमोद गावडे,बँक सर व्यवस्थापक दिपक पडेलकर,पी डी सामंत नितीन सावंत,के.बी.वरक,बँक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
