कृषीकन्यानी केली भाजीपाला लागवड

मसुरे (प्रतिनिधी): डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत, उद्यान विद्या महाविद्यालय-मुळदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पोईप येथेवेळ वर्गीय भाजीपाला प्रात्यक्षिक सादर केले. सदर विद्यार्थी हे शेती विषयक ज्ञानाची शेतकऱ्यांबरोबर देवाणघेवाण करीत आहेत. वेलवर्गीय भाजीपाला काकडी, कारले, दुधीभोपळा,पडवळ, भेंडी, दोडकी आणि घोसाळी यांची लागवड केली होती. या उपक्रमात प्रणिता बिरादार, साक्षी कडव, ऋतुजा पाटील, प्राची मोरे, अनु पाॅल आणि नेहा भावठणकर या विद्यार्थिनीचा समावेश होता.

error: Content is protected !!