परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४६ वा पुण्यतिथी उत्सव १५ ते १९ डिसेंबर कालावधीत हाेणार संपन्न

विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमासह किर्तन महाेत्सवाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : याेगी यांचे याेगी परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४६ वा पुण्यतिथी उत्सव १५ ते १९ डिसेंबर या कालावधीत कनकनगरीत साजरा होणार आहे. यानिमित्त परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्यावतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

यामध्ये शुक्रवार १५ ते सोमवार १८ डिसेंबर या कालावधीत दररोज पहाटे ५.३० ते ७.३० वाजेपर्यंत समाधीपूजन व काकड आरती, सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० भक्त कल्याणार्थ धार्मिक विधी ‘भालचंद्र महारूद्र, महाभिषेक अनुष्ठान’, दुपारी १२ ३० ते १ वाजेपर्यंत महाआरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद तसेच १ ते ४ सुस्वर भजने, सायंकाळी ४ ते ७.३० कीर्तन, रात्री८ वाजता दैनंदिन आरती असे कार्यक्रम होणार आहेत.

मंगळवार १९ डिसेंबर हा परमहंस भालचंद्र महाराज यांचा पुण्यतिथी दिन असून यानिमित्त पहाटे ५.३० वाजता समाधीपूजन, काकड आरती व जपानुष्ठान, सकाली ८ ते १०.३० भजने, सकाळी १०.३० ते १२.३० समाधी स्थानी मन्यूसुक्त पंचामृताभिषेक, दुपारी १२.३० ते १ महाआरती, दुपारी १ ते ५ भजने, सायंकाळी ५ वाजता परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये घोडे, उंट तसेच वारकरी व नागरिक सहभागी होणार आहेत. पालखी परत आश्रमात आल्यावर दैनंदिन आरती होणार आहे रात्री ११ वाजता भालचंद्र दशावतार नाट्य मंडळ हळवल यांचा ‘भक्त महिमा’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.

कीर्तन महोत्सवाचे आयोजन

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थानच्यावतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. १५ ते १८ डिसेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते ७.३० या कालावधीत नामवंत कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत. यामध्ये शुक्रवार १५ रोजी ह भ प विश्वासबुवा कुलकर्णी (पुणे) विषय-संत तुळशिदास, १६ रोजी ह. भ. प. संध्या पाठक-पोतदार (सांगली) विषय-श्रीनाथ संप्रदाय गुरुशिष्य, १७ रोजी ह.भ.प. उध्दवबुवा जावडेकर (पुणे) विषय-संत कान्होपात्रा, सोमवार १८ रोजी ह.भ.प. मंजुषाताई भाभे (मुंबई) विषय-समर्थ रामदास स्वामी यांचे कीर्तन होणार आहे. या सर्व कीर्तनकारांना संगीत साथ हार्मोनियम माधव गावकर (असगणी), तबला शिवाजी पवार (गोठोस) व पखवाज गजानन देसाई (वालावल) पांची असणार आहे.

संस्थानमधीत पुढील उत्सव

परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० वा जन्मोत्सव सोहळा रविवार २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत साजरा होणार आहे तर महाशिवरात्री उत्सव शुक्रवार ८ मार्च २०२४ रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!