धन्यवाद नौसेना जी ! धन्यवाद मोदीजी !!

कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी व्यक्त केल्या भावना

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : 4 डिसेबर हा ‘नौसेना दिन’ म्हणुन देशात साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे प्रमुख होते. परकियांचे आक्रमण थांबविण्यासाठी शिवाजी महाराजांनी मालवण जि. सिंधुदुर्ग येथे किल्लाची निर्मिर्ती केली. याच पार्श्वभुमीवर नौसेना विभाग आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दी. 4 डिसेबर हा नौसेना दिन मालवण येथे पहिल्यांदा साजरा केला ही बाब सिंधुदुर्ग जिल्हा साठी मोठी कौतुकाची अणि अभिमानाची आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवण येथे राजकोट किल्ला बांधला होता परंतु राजकोट किल्लाचे काहीही अवशेष शिल्लक नव्हते.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राजकोट किल्लाची पुर्नबांधणी केली याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा परकिय आक्रमण थोपवण्यासाठी युध्दांच्या आवशेषात पश्चिमेकडिल मुख असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.या पुतळयाची उंची 28 फुट आहे.चबुदराची उंची 15 फुट आहे. तसेच पुतळयासाठी 2 कोटी 44 लक्ष खर्च आला आहे. पुतळा व पुतळयाच्या चबुदराचे बांधकाम नौसेना विभागामार्फत करण्यात आलेले आहे. मात्र यासाठी लागणारा निधी सार्वजनीक बांधकाम विभाग मार्फत दिला आहे राजकोट किल्ल्यावर राज्य शासनाच्या मालकिची 33 गुंठे जागा उपलब्ध होती. सदरची जागा या जिल्ह्य़ासाठी अंत्यंत तळमळीने काम करणारे सिंधुदुर्ग जिल्हा चे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी तात्काळ राज्य शासना कडून प्रस्ताव युद्धपातळीवर मंजूर करुन घेऊन जागा सार्वजनिक बांधकाम विभाग कडे वर्ग केली MCRZA चि परवानगी, पुतळा बांधकाम अणि राजकोट किल्ल्याचे बांधकाम करणेसाठी आवश्यक त्या मंजुऱ्या व परवानगी तात्काळ करुन दिल्या ही बाब अंत्यंत उल्लेखनीय आहे. यासाठी लागणारा

निधीची तरतुद आदरनीय रविंद्र चव्हाण पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री यांनी करुन दिली आहे. किल्ल्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम मार्फत अवघ्या दोन महिन्यात विक्रमी वेळात दर्जेदार व उत्कृष्ट रित्या पूर्ण केलेले आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयांचे अनावरण देशाचे पंतप्रधान आदरनीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झालेले आहे. त्या पार्श्वभुमीवर मालवण तालुक्यातील व मालवण शहराला जोडणारे सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे. या निमित्ताने जवळपास 25 कि.मी. लांबीचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे.अणि 100 कि.मी. लांबी चे रस्ते सुस्थितीत करण्यात आलेली आहे. जवळपास 100 कि.मी. लांबीचे रस्ते सुरक्षितेच्या दृष्टिकोनातुन पांढरे पटटे, कॅटाआईज बोर्ड लावुन रस्ते सुरक्षित करण्यात आले आहे.यामुळे मालवणवासीय यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कौतुक केलेले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचे अनावरण केल्यामुळे मालवण, सिंधुदुर्ग व राजकोट किल्ला जगाच्या नकाशावर अधोरेखित निश्चितपणे झाला आहे. दि. 5 डिसेंबर पासुन हजारोंच्या संख्येने लोक राजकोट व छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन प्रेरणा,स्फुर्ती घेण्यासाठी लो‍क येत आहेत. राजकोट किल्लामुळे मालवण शहराच्या पर्यायी नी सिंधुदुर्ग जिल्हा च्या वैभवामध्ये भर पडली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटक म्हणुन ओळखला जातो. राजकोट किल्ल्यामुळे मालवण शहरात व पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्हयात मोठया प्रमाणात पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे आतापर्यंत राजकोटकिल्ला जवळपास 25 हजार लोकानी भेट दिली.आता सिंधुदुर्ग जिल्हयाचे आर्थिक स्त्रोत तसेच दरडोई उत्पन्न निश्चितपणे वाढीस लागणार आहे.नौसेना दिनानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाने सुयोग्य नियोजन केले. 100 कि.लांबीचे रस्ते सुस्थितीत पुर्ण केले.राजकोट किल्ला विक्रमी वेळात पुर्ण केला.राजकोट किल्ल्याचे बांधकाम उत्कृष्ट व विक्रमी वेळात केले त्यामुळे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व मान्यवर मंत्री महोदयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचे गोड कौतुक केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कौतुकाचे सिंधुदुर्ग जिल्हयात व महाराष्ट्रात सर्वत्र कौतुक होत आहे.या प्रकल्पात मला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे अनावरण नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे मालवण व सिंधुदुर्ग जिल्हा चा भविष्यात निश्चित कायापालट होईल मालवण,सिंधुदुर्ग व राजकोट किल्ल्याचा इतिहास जगाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित निश्चलपणे झाला आहे.त्यासाठी आवर्जुन म्हणावयासे वाटते की, धन्यवाद नौसेना जी! धन्यवाद मोदीजी.!!

error: Content is protected !!