कणकवली (प्रतिनिधी) : अजय तुळशीदास रावराणे सरपंच लोरे नं 1 यांच्या मागणी नुसार मनोज रावराणे माजी सभापती कणकवली पंचायत समिती यांच्या प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजना या योजनेमधून मौजे लोरे चौक्याचा माळ येथे स्मशानभूमी बांधण्याचे काम आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाले असून दिनांक 14 डिसेंम्बर रोजी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी कणकवली पंचायत समिती माजी सभापती मनोज रावराणे,गावचे सरपंच अजय रावराणे उपसरपंच सुमन गुरव, प्रकाश रावराणे,प्रभाकर रावराणे,सुनील रावराणे अनंत राणे आदी उपस्थित होते.