कणकवली (प्रतिनिधी): दिनांक १६डिसेंबर २०२३ रोजी अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलच्या इयत्ता ७वी, ८वी व ९वी च्या विद्यार्थ्यांनी संकल्प प्रतिष्ठान मार्फत आयोजित करवंटी हस्तकला प्रशिक्षण ला भेट दिली.हे प्रशिक्षण गोपुरी आश्रममध्ये आयोजित करण्यात आले होते.
या उपक्रमाच्या वेळी करवंटी पासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये लॅम्प ,कप बशी ,मोबाईल स्टॅन्ड ,किचन, कुंडी, गणपती ,साबण स्टॅन्ड, ससा, कासव ,मासा, चहाचे कप, चंद्रकोर ,परडी, क्रिकेट चषक, फुलदाणी अशा विविध वस्तूंचे प्रात्यक्षिक कार्य चालू असताना निरीक्षण करण्यात आले व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसरन करण्यात आले. त्यावेळी संकल्प प्रतिष्ठानचे मान. शेख सर, गोपुरी आश्रमाचे सचिव विनायक मेस्त्री सर, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे मान. दादा कुडतरकर सर, प्रांताधिकारी मान. कातकर सर, डॉ. सुहास पावसकर सर, ज्येष्ठ पत्रकार श्री .अशोक करंबेळकर सर यांनी या उपक्रमाची उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली व अनमोल असे मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी संस्थेच्या संचालिका सुलेखा राणे मॅडम, संस्थेचे अकॅडमीक डायरेक्टर संदीप सर, सापळे सर, संस्थेच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, वर्गशिक्षिका नेहा मसुरकर मॅडम, शिल्पा तिवरेवर मॅडम या सर्वांचे या उपक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले.
बाल शिवाजी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी करवंटी हस्तकला प्रशिक्षण कार्यशाळेला भेट












