उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सुनील पारकर यांच्याकडून रुद्र अभिषेक
कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कणकवली तालुका समन्वयक सुनील पारकर यांनी एसटी वर्कशॉप येथील गणेश मंदिरात रुद्र अभिषेक केला.नामदार उदय सामंत यांना दीर्घायुरारोग्य लाभो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे असे साकडेही गणपती बाप्पाकडे घालण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, युवासेना तालुकाप्रमुख निलेश तेली उपस्थित होते.












