खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कणकवली तालुक्यातील तळेरे प्रभाग स्तरीय बाल,कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार,समूह गान व समूह नृत्य स्पर्धेत जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शालेय विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात घवघवित यश संपादन केले असून विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
सदर स्पर्धेत खारेपाटण केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानी मी होणार मोठा गट (प्रथम क्रमांक),समूह गीत गान लहान गट (द्वितीय क्रमांक), समूह नृत्य मोठा गट (प्रथम क्रमांक), खो – खो मोठा गट – मुली(प्रथम क्रमांक),गोळा फेक – राहत फातिमा सारंग (द्वितीय क्रमांक),उंच उडी – श्रीया राऊत – मुली (द्वितीय क्रमांक),उंच उडी – तन्मय जेधे मुलगे (प्रथम क्रमांक) आदी विविध स्पर्धेत यश संपादन केले असून या विद्यार्थीची पुढे होणाऱ्या कणकवली तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर, शा.व्य.स. अध्यक्ष प्राप्ती कट्टी,माजी अध्यक्ष, संतोष पाटणकर,सौ.गौरी शिंदे, उपाध्यक्ष मंगेश तेली, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष प्रियंका गुरव,पालक, शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.















