जिल्ह्यात “ह्या ” पोलीस ठाणे प्रभारींच्या बदली चे वारे

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : येत्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  कोकण परिक्षेत्रातील तसेच जिल्हा निहाय पोलीस ठाणे प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत चा अध्यादेश निघाल्याची माहिती असून 12 जानेवारी पर्यंत जिल्ह्यांतर्गत आणि 16 जानेवारी पर्यंत कोकण परिक्षेत्रातील पोलीस ठाणे प्रभारींच्या बदल्या होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पोलीस ठाणे प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. पोलिस ठाणे प्रभारी ही पोस्ट कार्यकारी दर्जाची असल्यामुळे सध्या प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यांना अकार्यकारी पोस्टवर बदलले जाऊ शकते.ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा 3 वर्ष सेवा कालावधी सिंधुदुर्गात झाला आहे अशा अधिकाऱ्यांची सुद्धा बदली जिल्ह्याबाहेर होण्याचे संकेत आहेत. तसेच जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असलेल्या आणि पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यांची बदली लोकसभा क्षेत्राच्या बाहेर अथवा अकार्यकारी पोस्टवर होण्याचे संकेत आहेत.

error: Content is protected !!