कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ, मुंबई संचलित ल. गो. सामंत विद्यालय, हरकुळ बुद्रुक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कु.नेहा रविंद्र घाडीगावकर आणि कु.कार्तिकी कांबळी यांनी NMMS (National Means Cum Merit Scholarship Scheme Exam 2022-23) यश प्राप्त केले. या परीक्षेत 8 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्था आणि प्रशालेतर्फे अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय समिती प्रमुख सुनिल घाडीगावकर,मुख्याध्यापक श्री नेवाळकर, जेष्ठ शिक्षक श्री.पाटील,सर्व शिक्षक, प्रशाला लेखनिक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थिनींना वही आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.श्री.नेवाळकर यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका एस. एस.तांबे यांनी केले.











