कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे जुनी फौजदार वाडी ते खोत वाडी खडीकरण व डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष,जिल्हा नियोजन समिती सदस्य सन्माननीय संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.ह्यावेळी भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका प्रमुख श्री.मिलिंद मेस्त्री,भाजपा सोशल मीडिया प्रमुख समीर प्रभुगावकर,जाणवली विभाग शक्ती प्रमुख राजेश हिर्लेकर,तरंदळे गावचे प्रथम नागरिक सरपंच.श्री.सुशिल कदम,उपसरपंच शुभावली सावंत,माजी सरपंच व तरंदळे तंटा मुक्ती अध्यक्ष श्री सुधीर सावंत,माजी सरपंच श्री.राजेश फाटक,सामाजिक कार्यकर्ते डॉ.सत्यवान राणे,माजी सरपंच सौ.नम्रता देवलकर,माजी उपसरपंच संदेश सावंत,ग्रामपंचायत सदस्य श्री.सुनील दत्त जाधव,संजय परब,दीपक घाडी गावकर,नेहा घाडी गावकर,माजी ग्रामपंचायत सदस्य देवा रावले, लक्ष्मीकांत सावत,सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत,जगन्नाथ तेली,संभाजी घाडी गावकर,वासुदेव तेली,दत्तू सावंत,राजाराम सावंत,आणि गावातील ग्रामस्थ,महिला,बंधू भगिनी उपस्थित होते.














