चिंदर दत्त मंदिर येथे उद्या 18 जानेवारी रोजी गंगा पूजन कार्यक्रम….!

चिंदर (प्रतिनिधी) : चिंदर गावठाणवाडी दत्त मंदिर येथे उद्या गुरुवार दिनांक 18 जानेवारी रोजी गंगा पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या निमित्त सकाळी दत्त महाराजांची विधिवत पूजा, गंगा पूजन कार्यक्रम, श्री राम प्रभूचा, गजर-औक्षण तसेच श्री राम जन्मभूमी संघर्ष, मार्गदर्शक -कारसेवक विलासजी हडकर, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, हळदीकुंकू, रात्री सुस्वर भजन, आरती असा कार्यक्रम होणार आहे तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त भक्त परिवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!