कणकवली(प्रतिनिधी): माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचे दिवंगत चेअरमन एल.डी.सावंत यांनी जवळ जवळ वीस वर्ष चेअरमन म्हणून कामकाज पाहिले.आपल्या चेअरमन पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांचे शाळेवर विशेष प्रेम व लक्ष होते.आणि प्रशासनाचा दांडगा अभ्यास होता. त्यामुळे शाळेच्या कामकाजा बाबत अभ्यासपूर्वक निर्णय घेत होते. त्यांनी प्रशालेचा विकास आणि कामकाज बाबत तन मन धन ओतून कार्य केले होते.
त्यामुळे मृत्यूनंतरही त्यांची नजर या प्रशालेवरवर कायमस्वरूपी राहावी या उद्देशाने कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे सनदी लेखापाल तुकाराम रासम यांनी आपले मामा एल. डी. सावंत यांच्या स्मरणार्थ माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेला 25 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे दिले आणि बॅकअप साठी लागणारा टी.व्ही. ही देखील दिला. त्याची एकूण किंमत एक लाख 65 हजार रुपये किंमतीचे हे साहित्य त्यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक एस. डी. दळवी सर प्रशालेचे अध्यक्ष सतीशजी सावंत साहेब, चेअरमन आर. एस.सावंत सर यांच्याकडे सुपूर्द केले. ही सी.सी.टी.व्ही.सुविधा दिनांक 10/02/2023 पासून कार्यान्वित झाली आहे. या सुविधेचा फायदा संस्थेच्या सुरक्षेसाठी निश्चितच होईल.
तुकाराम रासम यांनी प्रशाळेला दिलेल्या दातृत्व बद्दल क. ग. शिक्षण प्रसारक मुंबई मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सतीशजी सावंत, उपाध्यक्ष पी.डी. सावंत संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे चेअरमन आर.एच. सावंत , मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तुकाराम रासम यांचे आभार मानले आहे.