कुडाळ (प्रतिनिधी) : साई कला क्रिडा मंडळ नाबरवाडी व नगरसेविका श्रेया शेखर गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाची रुपरेखा खालीलप्रमाणे असणार आहे. सकाळी ९ वाजता शिवज्योतीचे आगमन, सकाळी १० वाजता शिवप्रतीमेचे पूजन, दुपारी 3 वाजता मुलांसाठी क्रिडा स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी खेळ, सायंकाळी ७ वाजता रेकॉर्ड डांस स्पर्धा.
दुपारी होणाऱ्या मुलांच्या क्रिडा स्पर्धेमध्ये २ गट असणार आहेत. लहान गट (४ ते ८ वर्ष )
मोठा गट (८ ते १४ वर्ष)
तसेच रेकॉर्ड डांस स्पर्धेत ही दोन गट असणार आहेत.
रेकॉर्ड डांस स्पर्धेचे बक्षीस –
मोठा गट – (१६ वर्षापुढील)
प्रथम क्रमांक – रु. ३०००/-, द्वितीय क्रमांक – रु. २०००/-, तृतीय क्रमांक – रु. १०००/-
लहान गट- १५ वर्ष पुर्ण व त्याखालील
प्रथम क्रमांक – रु. २०००/-, द्वितीय क्रमांक – रु. १५००/-, तृतीय क्रमांक – रु. ५००/-
या स्पर्धांसाठी स्पर्धकांनी आपली नावे ८७६७४३६३९३ / ८८५५००८४६४ / ९४२०७४११४९/ ९४०४७४९९१५ या क्रमांकावर संपर्क करुन द्यावीत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी शिवजयंती सोहळ्याच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन साई कला क्रिडा मंडळ व नगरसेविका श्रेया गवंडे यांनी केले आहे.












