पटवर्धन चौकात रस्ता सुरक्षा जनजागृती

कणकवली (प्रतिनिधी) : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ओरोस यांच्या वतीने कणकवली शहरातील पटवर्धन चौकात रस्ते वाहतूक आणि सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात आली.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमित पाटील, कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस राजाराम पाटील यांनी वाहनचालक, नागरिक याना रस्ते सुरक्षा बाबत मार्गदर्शन केले. वाहन चालवत असताना कोणती खबरदारी घ्यावी याबाबत माहितीपत्रक वाटप केले. यावेळी पत्रकार तुषार सावंत यांच्यासह वाहनचालक व नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!