भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग सहविचार सभा

21 जानेवारी रोजी डाॅ बाबासाहेब आंबेडकर जिल्हाभवन कणकवली येथे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून भारतीय बौद्ध महासभा व वंचित यांची सहविचार सभा रविवार दिनांक 21/1/24 रोजी कणकवली येथे सकाळीच 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे .वंचित आघाडीची जिल्ह्यातील वाटचाल, कामगिरी ,सद्यपरिस्थिती भविष्यातील ध्येयधोरणे, गावपातळीपासून जिल्हास्तरावर नव्या दमाच्या नेतृत्वाला पक्षात सामावून घेणे संधी देणे, पक्ष विस्तार व त्यात येणारया अडचणी बाबत चर्चा करणे. लोकसभा विधान सभा जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकी बाबतीत चर्चा करणे याबाबत विचार विनिमय होणार आहे.त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते गाव तालुक्यातील जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक सैनिक महिला उपासिका यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन विश्वनाथ कदम जिल्हाध्यक्ष आणि भाऊ कासार्डेकर जिल्हा सरचिटणीस तसेच भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग करण्यात आले आहे.

error: Content is protected !!