महायुतीधर्म महत्वाचा..आगामी निवडणूकित युतीच्या उमेदवारासोबत राहा – संजय आग्रे
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेनेचा एक ग्रा पं सदस्य असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून 40 लाखांचा विकासनिधी बिडवाडी गावाच्या विकासासाठी शिवसेनेने दिला. ज्यावेळी सर्व ग्रा पं सदस्य आमच्यासोबत असतील तेव्हा बिडवाडी गावासाठी विकासनिधी कधीच कमी पडणार नाही. आम्ही महायुती सरकार मध्ये असल्याने हा विकासनिधी देणे शक्य झाले आहे. लोकसभेला केंद्रीयमंत्री राणे अथवा किरण सामंत किंवा पालकमंत्री रवींद्र चव्हाण खासदारकी चे उमेदवार असतील. तसेच विधानसभेला विद्यमान आमदार नितेश राणे उमेदवार असतील. व्यक्तीपेक्षा महायुती महत्वाची आहे. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुती च्या उमेदवारांसोबत राहा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी केले.कणकवली तालुक्यातील बिडवाडी गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आग्रे बोलत होते. यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा संघटक संदेश पटेल, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, बिडवाडी उपसरपंच सुदाम तेली, दादा भोगले, ग्रा पं सदस्य आर्या राणे, अनिकेत राणे आदी उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी विशेष प्रयत्न करून दलित वस्ती सुधार योजना, लेखशीर्ष 2515 मधून बिडवाडी गावात लाखोंचा विकासनिधी मंजूर करून घेतला आहे. यामध्ये बिडवाडी मुंडे डोंगरी रस्ता मजबुतीकरण 10 लाख 96 हजार, चर्मकारवाडी स्मशानशेड 5 लाख, बौद्धवाडी सौर स्ट्रीट लाईट 5 लाख, बौद्धवाडीत संरक्षक भिंत बांधणी 10 लाख, हुंबरणे बौद्धवादी स्मशानशेड 5 लाख ह्या विकासकामांचा समावेश आहे.
















