कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार मा. वैभव नाईक यांनी घेतलेल्या पत्रकार परीषदे मध्ये शिवसेनेवर टिका केली आहे. प्रथम वैभव नाईक यांनी हि गोष्ट लक्षात घ्यावी की, विधानसभा अध्यक्ष यांनी शिंदे गट हिच खरी शिवसेना आहे हे निकालाद्वारे स्पष्टपणे जाहिर केले आहे. वैभव नाईक हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे वैभव नाईक यांनी स्वतःचा पक्ष कोणता हे अगोदर तपासावे. आ. नितेश राणे यांनी ज्या बॅनर वरून शिवसेना पदाधिकारी किंवा शिवसेनेवर टिका केली आहे ती समाज कंटकांच्या वातावरण बिघडविण्याच्या प्रकारामुळे गैरसमजातून झाली आहे. वस्तू तो बॅनर हा आमच्या पक्षाकडून किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याकडून लावण्यात आलेला नाही. भाजप आणि शिवसेना यांच्या झालेले समज आणि गैरसमज हा आमचा घरगुती प्रश्न आहे. आ. नितेशजी राणे साहेब यांच्याशी शिवसेनेचे कोणतेही वैर नाही. आ. नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली युतीचा अश्वमेध वेगाने, पळत आहे. कदाचित त्यामुळेच वैभव नाईक यांना पोटशूळ उठत आहेत. वैभव नाईक यांचे त्यांच्या मतदार संघात डळमळीत झालेले भवितव्य व त्यामुळे त्यांची झालेली संभ्रम अवस्था यामुळे त्यांची हि वैफल्यग्रस्त बडबड चालू आहे. पैसे देऊन कार्यकर्ता फोडणे याबाबतीत त्यांनी टिका करणे हे त्यांच्या मानसिक विषण्णतेचे उदाहरण आहे. याच वैभव नाईक यांना निवडणूक मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब, उदयजी सामंत साहेब, मा. किरण सामंत साहेब, यांनी किती व कोणत्या स्वरुपात मदत केली आहे याची त्यांनी जाणीव ठेवावी. नाईक स्वताच्या मतदार संघात जी रुग्णवाहिका फिरवत आहेत ती देखील खासदार श्रीकांतजी शिंदे फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांना मिळाली आहे. त्यांना जनाची नाही तर निदान मनाची लाज असेल तर त्यांनी हि रुग्णवाहिका मुंबईला नेऊन परत करावी. सामान्य जनता शिवसेना व शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे किंवा हे येथील जाहिर सभेवेळी साऱ्या महाराष्ट्राने पहिले आहे. नाईक यांच्या मतदार संघातून किती गाड्या सभेला गेलेल्या हे नाईक यांनी पडताळून पहावे. तेव्हा आमदार नाईक यांनी अशा प्रकरची बेताल वक्तव्य ण करता २०२४ नंतर स्वताच्या विजनवासाची तयारी करावी. कारण आ. वैभव नाईक यांची २०२४ च्या निवडणुकीत पराभवाची हंडी आम्हीच फोडणार.
