कणकवली नगरपंचायत निवडणूकीच्या मैदानात या..मीच पराभवाची धूळ चारतो

कृतघ्न म्हणून कणकवली च्या इतिहासात शेखर राणेंची नोंद

शिंदेगट उपजिल्हाप्रमुख शेखर राणेंवर ठाकरे गट उपशहरप्रमुख वैभव मालंडकर यांचा पलटवार

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांच्याबद्दल बोलायची शेखर राणे यांची लायकी नाही आहे. जेव्हा घरी पोलीस आले होते तेव्हा मागील दाराने पळून जाताना कोणाचा पाय फ्रॅक्चर झालेला आणि कोणाची हंडी फुटली होती ते अवघ्या कणकवली शहराने पाहिले आहे. जर खुमखुमीच असेल तर स्वतःच्या पक्षातून उमेदवारी मिळवून कणकवली नगरपंचायत निवडणूकीच्या मैदानात या. तुमच्याविरोधात मी उभा राहतो, तुम्हाला पराभवाची धूळ चारल्याशिवाय राहणार नाही अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली उपशहरप्रमुख वैभव मालंडकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख शेखर राणे यांच्यावर केली आहे. शेखर राणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करताना विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांचा पराभव करणार असल्याचा शाब्दिक वार केला होता.त्या टिकेल प्रत्युत्तर देताना वैभव मालंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून शेखर राणे यांना थेट कणकवली नगरपंचायत निवडणूक शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवून लढण्याचे आव्हान दिले आहे. शेखर राणे यांच्यावर टीका करताना मालंडकर यांनी म्हटले आहे की जेव्हा बेंगलोर ला पोलीस पकडून घेऊन गेले होते तेव्हा शिवसेनेच्या अरुण दुधवडकर यांनीच जामीन मिळवून दिला होता. नाहीतर तिकडे जेलमध्ये खितपत पडला असता. केलेले उपकार विसरणारा कृतघ्न म्हणून शेखर राणे यांची आठवण कणकवली शहराच्या इतिहासात नोंद राहील असेही मालंडकर यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!