श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त लिंगेश्वर मंदिरात दिपाेत्सव व महाप्रसादाचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : अयोध्या नगरी प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून कलमठ गावडेवाडी येथील श्री लिंगेश्वर मंदिरात सकाळी 11 वाजता आरती व दुपारी महाप्रसादाचे आयाेजन करण्यात आले हाेते.यावेळी कलमठ गावातील रामभक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.तसेच सायंकाळी 7 वाजता मंदिर परिसरात दिव्यांची राेषणाई करुन दिपाेत्सव साजरा केला.यावेळी महिला वर्ग,तसेच युवा वर्गाने मेहनत घेतली.

error: Content is protected !!