कणकवली (प्रतिनिधी) : श्री सिद्धकला भजन मंडळ कणकवली यांच्यावतीने बेळगांव निवासी परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती देवी यांच्या शिकवणुकी प्रमाणे व श्रीहरिमंदिरातील भक्त मंडळींच्या मार्गदर्शनाखाली हरिनाम सप्ताहाचे गुरुवार दि. 25 जानेवारी ते शनिवारी 27 जानेवारी या कालावधीत श्री लिंगेश्वर मंदिर कलमठ गावडेवाडी येथे आयाेजन करण्यात आले आहे.तीन दिवस चालणाऱ्या हरिनाम सप्ताहामध्ये राेज सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजता बाळगाेपाळांसाठी बालाेपासना व बाेधपर गाेष्टी, रात्री 8.30 ते 9.30 वाजता वारांचे सायंस्मरण भजन व कथाकथन आदी कार्यक्रम हाेणार आहे.
कार्यक्रमांचा बाळगाेपाळांनी बंधूभगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिद्धकला भजन मंडळ कणकवली यांच्यावतीने करण्यात आले आहे.












